जिल्हाधिकाऱ्यांना कोचिंग क्लासेस असोसिएशनचे निवेदन

पूर्ण नियमावलीत क्लासेस सुरु करण्याची मागितली परवानगी

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – सोमवारी दि,७ जून रोजी कोचिंग क्लासेस असोसिएशनकडून जळगाव शहराचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व महापौर सौ जयश्रीताई सुनील महाजन यांना 14 महिन्यापासून बंद असलेले कोचिंग क्लासेस पुन्हा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले.

या निवेदनामध्ये मागणी करण्यात आली की, पूर्ण नियमावलीमध्ये क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्या, कारण गेल्या चौदा महिन्यापासून कोचिंग क्लास वाल्यांना कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नसून , कोचिंग क्लास वाल्यांचे ऑफिस भाडे ,घर भाडे ,बँकेचे हप्ते ,घरखर्च संपूर्ण थकीत आहे,निवेदन देताना कोचींग क्लासेस असोसिएशन कडून जिल्हाध्यक्ष पंकज नाले,शहराध्यक्ष राहुल निकम सर , सदस्य श्री आर सी पाटील सर ,सह संघटक शिरीष पाटील सर शहर सचिव संदीप पाटील सर संघटन प्रमुख विजय सोनवणे सर उपस्थित होते.

coaching-classes-assocition-jalgaon

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here