हिंगणघाट (क्राइम रिपोर्टर आसीफ कूरेशी) – हिंगणघाट येथील पोलिसांनी अवैधरित्या साठविलेला 4.730 किलो. ग्रॅम वजनाचा गांजा जु. कि. 70,950 रू. चा जप्त करून एकाआरोपीस अटक केली आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, दिनांक 08/06/2020 रोजी पोहवा शेखर डोंगरे यांच्या डी.बी. पथकांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून हिंगणघाट पोलीसांनी फुले वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा विजय उर्फ बावा माणिक कोथरे वय 40 वर्षे याच्या घरी कायदेशिररित्या एन.डी.पी.एस. छापा टाकला असता, तो त्याचे घराचे घरझडतीत एका प्लास्टीक पोत्यामध्ये 4.730 किलोग्रॅम वजनाचा गांजा एकुण किमंत 70,950 रू. चा माल मिळुन आला.
सदरचा गांजा बाबत आरोपी विजय कोथरे यास विचारपुस केली असता त्याने सदरचा गांजा हा फुले वार्ड, हिंगणघाट येथे राहणारा राकेश सिद्धार्थ जनबंधु (पसार) याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सदरचा गांजा जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला. याबाबत पो. स्टे. हिंगणघाट येथे अप. क.505/2021 कलम 20 (ब) 29 एन.डी.पी.एस. अन्वये दिनांक 08/06/2021 रोजी आरोपीतां विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सपोनि प्रशांत पाटणकर हे करीत आहे.
सदरची कामगिरी प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, दिनेश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. संपत चव्हाण, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात सपोनि प्रशांत पाटणकर, डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर, विरेन्द्र कांबळे, संदिप बदकि यांनी केली आहे.



