शिवराज्य ब्रिगेडच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी जगदीश घरत यांची नेमणूक

अधिकाधिक सामाजिक कार्य करण्याचा जगदीश घरत यांचा संकल्प

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – रायगड जिल्ह्यातील अलिबागचे सुपुत्र जगदीश घरत यांच्या सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांची “शिवराज्य ब्रिगेड”च्या जिल्हा अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

“शिवराज्य ब्रिगेड” संघटनेचे संस्थापक ब्रिगेडियर (निवृत्त) सुधीर सावंत यांच्या हस्ते संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमोल (भैय्या) जाधवराव यांच्या स्वाक्षरीचे नियुक्तीपत्र बहाल करून रायगड जिल्ह्याची जबाबदारी जगदीश धरत यांच्यावर नुकतीच सोपविण्यात आली आहे.

shivrajya-bigrade

“माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत मला मिळालेल्या या नव्या संधीचा उपयोग मी अधिकाधिक सामाजिक कार्य करून जनतेसाठीच करीन”, असा संकल्प यावेळी जगदीश घरत यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here