मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय चर्चा करून तोडगा काढावा; मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक पी.एम.पाटील यांचे मोदींनी पत्र

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिष्टमंडळांनी भेट घेतली. त्यातून पंतप्रधान मराठा आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतील अशी आशा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

वास्तविक पाहता महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहेत मग आरक्षण कोण देत नाही? किंवा कोण आरक्षणाच्या आड येत आहे? या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कोड पडले आहे.

सर्व तयार आहेत मग आरक्षण का मिळत नाही समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित यातून मार्ग काढतील अशी संपूर्ण मराठा समाजाला आशा आहे. जळगाव जिल्हा मराठा समाजाचे क्रांती मोर्चाचे संयोजक माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत मार्ग काढून द्यावा, अशी विनंती लेखी पत्र लिहून केली आहे. हे पत्र पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here