यावल (तालुका प्रतिनिधी डॉ.मोहन साळुंखे) – फैजपुर येथील तापी परिसर विद्यामंडळा द्वारे संचलित धनाजी नाना महाविद्यालयात आयक्यु एसी व सेक्सुअल हॅरेशमेट कमिटी च्या संयुक्त विद्यमाने “लैंगिक अत्याचार ” या विषयावर दि 9जून ला ऑनलाईन बेमिनार चे आयोजन करण्यात आले धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य व आयक्यु ए सी चेअरमन डॉ उदय जगताप हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते
त्यांनी आपल्या अध्यक्षीय संबोधनात सांगीतले की आमच्या महाविद्यालयात “लैंगिक अत्याचार ” समिती कार्यरत आहे तसेच मुलीच्या बाबतीत जवळची व्यक्ती जास्त त्रासदायक ठरते मुलींनी धाडस दाखवले तर काही प्रसंग टळतील प्रमुख वक्ता ॲड.क्रांती कुमार रोटे मेम्बर ऑफ लिगल ॲडव्हायझर सर्विस कल्याण मुंबई या होत्या. त्यांनी लैंगिक अत्याचार विविध प्रकारे कसा होतो हे सांगितले. स्त्रियांना जाणून बुजून मारलेला धक्का व चुकून मारलेला धक्का सहज समजतो . कौटुंबिक हिंसाचार,हुंडाबळी ,लैंगिक अत्याचार या संबंधीच्या विविध कायद्याची माहीती दिली.
लॉकडाऊनमध्ये सेक्सुअल हॅरेशमेटचे प्रकार वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले .बदल स्वतः मध्ये घडवा हे नमूद केले प्रास्ताविक व परिचय डॉ.कल्पना पाटील यांनी केला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी उपप्राचार्य डॉ अनिल भंगाळे,प्रा अनिल सरोदे,प्रा. डी बी तायडे यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रम च्या यशस्वीतेसाठी डॉ ताराचंद सावसाकळे डॉ.सीमा बारी डॉ.सविता वाघमारे डॉ सरला तडवी डॉ जयश्री पाटील प्रा जयश्री सरोदे प्रा. पल्लवी प्रा. नाहीदा कुरेशी प्रा. वैशाली कोष्टी आदि चे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे आभार डॉ.सीमा बारी यांनी मानले






