भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

रांची (झारखंड) – कायदे कितीही कठोर केले, कितीही शिक्षा सुनावली तरी अल्पवयीन मुली, महिलांवरचे अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. उलट अत्याचाराची परिसीमा गाठली जात असल्याचं दिसतं आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये जे घडलं आहे ते ऐकूण, वाचून तळपायाची आग मस्तकाला जाईल

झारखंडमधील पलामू येथे भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन, आरोपींनी तिचे डोळे काढले, नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह चक्क झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमारसिंह नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. मुलीचं वय 16 वर्ष होतं.

ही घटना आहे 7 जूनला घडली. म्हणजेच तीन दिवसांपुर्वीची. पीडीत मुलगी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. मुलगी परतली नाही म्हणून आई वडीलांनी तिची शोधा शोध केली पण काहीच पत्ता लागला नाही. काही माहितीही मिळत नव्हती. शेवटी भाजपचे स्थानिक नेता असलेल्या वडीलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी मुलीचा शोध सुरु केला.

मुलगी बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे 9 जून रोजी लालीमाटीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. कुटुंबियांनी ओळख पटवल्यानंतर ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री पटली. घटनास्थळावरुन एक मोबाईल पोलीसांच्या हाती लागला, त्यावरुन एकाला अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलीचे डोळे काढले गेल्याचं तिच्या वडीलांनीच सांगितलं आहे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. जिच्यावर बलात्कार झाला ती सर्वात मोठी मुलगी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here