मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – ८ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास अंधेरी पूर्वेच्या महाकाली गुंफेजवळ मनविसे जोगेश्वरी विधानसभा विभाग अध्यक्ष संतोष लोखंडे यांच्यावर २ अज्ञात इसमांनी हल्ला केला.
आरोपींनी अंधाराचा फायदा उचलत लोखंडे यांच्या पाठीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना जखमी केले आणि तेथून फरार झाले. या हल्ल्यात लोखंडे यांच्या पाठीवर गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने विलेपार्लेच्या कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या घटनेनंतर अंधेरी पूर्वच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हल्ल्याचं कारण अजून अस्पष्ट असून एमआयडीसी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. लोखंडे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र सैनिक तीव्र निषेध करत आहेत आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.






