10 वर्षाच्या मुलीवर 6 अल्पवयीन मुलांकडून सामुहिक बलात्कार, व्हिडीओ काढून व्हॉट्सअ‍ॅपवर केला व्हायरल

रवाडी (हरियाणा) – येथे 10 वर्षाच्या मुलीवर सात मुलांनी आळीपाळीने सामुहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील धक्कादायक बाब म्हणजे यातील 6 आरोपी ही अल्पवयीन मुलं आहेत. या मुलांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला आणि तो अनेकांच्या व्हॉट्सअपवर फिरवला. मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दाखल केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

अल्पवयीन मुलगी इयत्ता तिसरीत शिकत आहे. घराजवळच्या शाळेच्या अंगणात 25 मे रोजी ती खेळत होती. त्यावेळी अल्पवयीन पोरांनी शाळेच्या मैदानात मुलीला खेळताना पाहिलं. सहा-सात जणांच्या टोळीनं तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. बलात्कार करणारी ही मुलं अल्पवयीन आहेत. आठ ते चौदा या वयोगटातील आहेत. इतक्या लहान वयातील मुलांनी, असं कृत्य केल्याने सगळा देश हादरुन गेलाआहे.

या मुलांनी विकृत आनंद मिळविण्यासाठी बलात्कार तर केलाच पण या घटनेचा व्हिडीओ मोबाईलवर शूट केला. मोबाईलवर शूट केलेला व्हिडिओ संबंधित मुलांनी अनेकांच्या व्हाट्सअप वर पाठवला. ज्यावेळेस पोरांच्या वडिलांनी हा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस त्यांना देखील हादरा बसला. याबद्दलची अधिक चौकशी पोलीस करत आहेत रेवाडीचे डीसीपी हंसराज यांनी तपासाची सूत्रं हातात घेतली आहेत. तूर्तास अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here