रात्री मित्रांना दिली दारुची पार्टी, मात्र सकाळी गँगरेपचा आरोप करत तरुणीने केली आत्महत्या

बडौदा (गुजराथ) – गुजरातमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीने आपल्या घरात पार्टी ठेवली होती. पार्टीनंटर मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. नंतर बदनामीच्या भितीने पीडि तरुणीने आत्महत्या केली आहे.

गुजरातमधील वडोदरामध्ये एक 19 वर्षीय तरुणी कॉलेजमध्ये शिकून काम करत होती. सहा महिन्यांपूर्वी तिच्या आईचे निधन झाल्याने ती एका घरात भाड्याने राहत होती. दोन दिवसांपूर्वी तिने ऑफिसमधल्या दोन मित्रांना आणि मैत्रिणीला घरी पार्टीसाठी बोलवले.

पार्टीमध्ये तरुणी खूप दारू प्यायली. तरुणी दारूच्या नशेत असल्याने दोन्ही मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिथून निघून गेले. सकाळी उठल्यावर आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला कळाले. पीडित तरुणीने आपल्या मैत्रिणीला सर्व घटना सांगितली. मैत्रिणीने पीडित तरुणीला पोलिसांकडे जाण्यास सांगितले. परंतु बदनामीच्या भितीने ती पोलिसांकडे गेलीच नाही आणि आत्महत्या केली. पोलिसांना ही बाब कळाल्यानंतर त्यांनी दोन्ही अरोपींना अटक केली आहे. तसेच याबाबत पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here