पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दोघे जागीच ठार

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जमखी झाला आहे. गुरुवारी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पु्ण्यामधून जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला जात असताना गाडीचा टायर फुटल्याने घटना घडली. नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही लातुर) यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला. तर चालक नवनाथ खंडु कांबळे (वय. २८ रा. लातुर) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, लातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. ती घेऊन गावी जात असताना या महामार्गावरील उतारावर गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले. तर चालक गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीतील जखमी व मृतांना गाडीबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते. तर चालकांस गाडीतून बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here