देशातील ऐतिहासिक स्थळे 16 जूनपासून खुली होणार

आग्रा (उत्तरप्रदेश) – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात सर्वत्र लॉकडाऊनसदृश निर्बंध जारी करण्यात आल्यानंतर देशातील ऐतिहासिक स्थळेही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. तथापि, ही स्थळे आता 16 जूनपासून पर्यटकांसाठी पूर्ववत खुली करण्यात येतील, अशी घोषणा भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे करण्यात आली आहे.

यात आग्रा येथील प्रख्यात ताजमहालचाही समावेश आहे. ताजमहालही पर्यटकांसाठी बरेच दिवस बंद होता. तोही 16 जूनपासून सुरू होणार आहे. ताजमहालची तिकीट विक्री केवळ ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार आहे. प्रत्यक्ष जागेवर ही तिकीट विक्री केली जाणार नाही.

त्यामुळे पर्यटकांच्या तिकिटासाठी रांगा लागणार नाहीत आणि त्यासाठी नाहक गर्दी होणार नाही, याचीही दक्षता यानिमित्त घेतली गेली आहे. आग्रा किल्ला आणि दिल्लीतील लाल किल्ला अशी ठिकाणेही 16 जूनपासून सुरू होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here