नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – येथील ऐरोलीमध्ये गोळीबार झाला असून, जन्मदात्या पित्यानेच आपल्या मुलांवर गोळीबार केला आहे. गोळीबार करणारे निवृत्त पोलीस कर्मचारी असून, त्यांचे नाव भगवान पाटील आहे.
भगवान पाटील यांनी मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या केली आहे. यामध्ये एक मुलगा विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली आहे. विजय याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या गोळी झाडणाऱ्या पित्याला पोलिसांनी अटक करून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अजून समजू शकले नाही.






