पारोळा मॉब लिंचिंग घटनेतील ४आरोपींना पोलीस कोठडी

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – पारोळा रस्त्यावरील वसंतवाडी ग्रामस्थांनी २२ जुलै रोजी रात्री २ वाजेच्या दार्मियान टेम्पो मधून चोपडा ते मालेगाव गुरे वाहून घेणारे ड्राइवर व क्लिनर यांना दोरखंडाने झाडाला अमानुष पणे मारहाण केली होती त्या प्रकरणी २४ जुलै रोजी जळगावी फारूक शेख यांनी पोलीस अधीक्षक यांना तक्रार केल्यावर भादवी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असूनआज त्यातील ४ असरोपींना अटक करून पारोळा न्यायालयात न्यायाधीश मा पी जी महालांकर यांचे समक्ष उभे केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशी अधिकारी स पो नि निलेश गायकवाड यांनी अत्यंत मुद्देसूद व कायदेशीर म्हणणे मांडले असता त्यावर न्यायालयाने पोलीस कोठडीचे आदेश दिले.
दोन दिवसांपूर्वी १९ आरोपींची झाला होता जामीन
२६ जुलै रोजी पारोळा न्यायालयात न्यायाधीश एम के पाटील साहेब यांच्या कोर्टाने याच गुन्ह्यातील १९ आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली होती व २७ जुलै रोजी त्यांची जामीन सुद्धा मंजूर करण्यात आली
अमळनेर सेशन कोर्टात अपील दाखल होणार..
पारोळा येथील कनिष्ठ न्यायालायबे ३०७ कलमात पोलीस कोठडी न देता जामीन दिल्या बद्दल पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अमळनेर न्यायालयात अपील व १९ आरोपींनचे जामीन रद्द साठी अर्ज दिला आहे. मानियार बिरादरी/जखमी व्यक्ती चे सुद्धा त्रयस्थ अर्जदार म्हणून म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे न्हाणून अर्ज दाखल करणार आहोत. पारोळा न्यायालयातील एकाच गुन्ह्यातील दोन न्यायधीश मधील निर्णयाने वकील वर्गात दिवसभर चर्चा सुरू होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here