पुण्यात खाण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

rape-on-minor
file photo

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पदपथावर राहणाऱ्य़ा अल्पवयीन मुलीला नाष्टा खायला देण्याच्या बहाण्याने तिला दुचाकीवर बसून एका स्मशानभूमी परिसरात नेले. त्यानंतर त्याने अत्याचार करताना मुलीने विरोध केला. त्याचा राग आल्यामुळे सराईताने मुलीचा गळा दाबून केस ओढून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रवींद्र उर्फ बल्ली कांबळे या आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी अल्पवयीन मुलगी स्वारगेट परिसरातील एका पदपथावर कुटूंबियासोबत राहते. त्याठिकाणी ये-जा करणाऱ्य़ा सराईत रवींद्र उर्फ बल्लीसोबत मुलीची ओळख झाली. त्याच ओळखीचा गैरफायदा घेउन 15 जूनला सकाळी साडेनउच्या सुमारास रवींद्रने मुलीला नाष्टा खायला देण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून स्मशानभूमी परिसरात नेले. त्याठिकाणी त्याने मुलीवर लैगिंक अत्याचार करण्यचा प्रयत्न केला, परंतु मुलीने विरोध केला. तेव्हा बल्लीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर बलात्कार केला.

याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. संबंधित आरोपी सराईत गुन्हेगार असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दीपक जमदाडे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here