लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला अटक

जयपूर (राजस्थान) – लग्नाच्या आमिषाने मित्राच्या बहिणीवर सहा वर्ष बलात्कार करणाऱ्या कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली आहे. राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात ही घटना घडली. मित्राच्या घरी येणं-जाणं असल्यामुळे ओळखीचा गैरफायदा घेत पोलीस हवालदाराने दुष्कर्म केल्याचा आरोप आहे. आरोपी पोलीस जयपूर पोलीस आयुक्तालयात तैनात आहे.

आरोपी कॉन्स्टेबल संजय हा राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्याचा रहिवासी आहे. सध्या त्याची पोस्टिंग जयपूरमध्ये पोलीस आयुक्तालयात होती. लग्नाच्या आमिषाने संजयने सहा वर्षांपासून पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा दावा केला जात आहे. वर्दीचा धाक दाखवत त्याने पीडितेला अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचंही बोललं जातं.

यासंदर्भात 26 मे 2021 रोजी पीडितेने पोलिसात तक्रार दिली. आपल्या भावाचा मित्र संजयने लग्नाचं आमिष दाखवत 6 वर्ष लैंगिक संबंध ठेवले, असा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर दादिया पोलिसांनी झुंझनूतील हुकुमपुरा भागात राहणारा आरोपी कॉन्स्टेबल संजयला बेड्या ठोकल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here