कोदवडी वेल्हा येथील तलाठी आठ हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) –  दहा हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजारांची लाच स्वीकारताना कोदवडी वेल्हा येथील तलाठ्याला लाचलुचपत विभागाच्या पथकाने पकडले. खरेदी करण्यापुर्वी जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उतारऱ्यांवर नोंद घेण्यासाठी तलाठ्याने ही लाच घेतली आहे.

मुकुंद त्रिंबकराव चिरटे (34. रा. नसरापूर ता. भोर, तलाठी कोदवडी वेल्हा) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याप्रकरणी, स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदार यांचे संस्थेनी 20 गुंठे जागा दामगुड आसनी,वेल्हा येथे विकत घेतली आहे. खरेदी करण्यापूर्वी संबंधीत जागेचा उतारा देण्यासाठी व खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर नोंद घेण्यासाठी तलाठी चिरटे याने दहा हजाराच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती.

दरम्यान, तक्रादाराने याबाबतची तक्रार एसीबीकडे दाखल केली होती. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने खातरजमा केली असता, तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार सापळा रचून लाच घेताना तलाठ्याला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here