पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूंना ब्लॅकमेल करत 20 लाखांची खंडणी मागितली होती. २० लाखांची खंडणी मागणाऱ्यांना क्राइम ब्रांचने सापळा रचत अटक केली आहे. यामध्ये करण परदेशी, सुनील परदेशी, अक्षय कार्तिक, पूनम परदेशी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यासोबतच आणखी दोघांना अटक करण्यात आलं आहे.
आरोपींनी दुधात काळा रंग असल्याचं म्हणत चितळेंकडे खंडणी मागितली. आरोपींमधील पूनम परदेशी या प्रतिष्ठित शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी ईमेल आणि फोन करत दुधात काळ्या रंगाचा पदार्थ सापडला असल्याची तक्रार चितळे बंधूंकडे केली. त्यासोबतच त्यांनी पाच लाखांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर बदनामी करून दुकान बंद करायला लावू अशी धमकीही त्यांनी दिली.
आरोपींनी आधी पाच लाखांची मागणी केली होती त्यानंतर २० लाखांची मागणी केली होती. चितळे बंधूंनी तक्रार केली त्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलिसांनी चितळे बंधूंना चलनात नसलेल्या २ हजारांच्या रुपयांच्या नोटा देत एकूण २ लाख दिले होते. आरोपींनी सर्व पैसे घेतले त्यावेळी पोलीस लांब उभे राहून सर्व प्रकार पाहत होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली. आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं.






