युवकानं घरात घुसून प्रेयसीवर गोळी झाडली अन् आत्महत्या केली

gunfire

इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका माथेफिरू युवकानं घरात घुसून युवतीला गोळी मारली आहे. त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या दोघांना जखमी अवस्थेत नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. या घटनेत मुलीची अवस्था गंभीर आहे तर माथेफिरू युवकाचा मृत्यू झाला आहे.

पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहे. प्रेम संबंधातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लॉकडाऊनच्या आधीपासून या दोघांमध्ये मैत्री होती. युवक युवती एकाच कंपनीत काम करत होते. युवकाने थेट घरात घुसून युवतीवर गोळी झाडली. त्यानंतर स्वत:ला गोळी मारली. या घटनेत युवकाचा मृत्यू झाला आणि युवती गंभीररित्या जखमी झाली आहे. गोळी मारण्यापूर्वी युवकानं युवतीला सांगितलं की, ना मी जिवंत राहणार ना तु आता वाचणार असं म्हणत त्याने गोळी मारली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलीचं लग्न दुसऱ्याठिकाणी निश्चित झालं होतं. साखरपुडाही ठरवण्यात आला होता. त्यामुळे युवक खूप त्रस्त होता. शनिवारी रात्री युवकाने थेट मुलीच्या घरात प्रवेश केला. रागाच्या भरात युवकाने युवतीवर बंदुकीतून गोळी झाडली. गोळी मुलीच्या कानाला टच होऊन निघून गेली. त्यानंतर युवकाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या स्थितीत दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात युवकाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले तर युवतीवर सध्या उपचार सुरू आहेत. ती लवकर बरी होईल असं डॉक्टर म्हणाले.

या घटनेनंतर पोलीस प्रेम संबंधाचाही तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपी मुलाच्या घरच्यांची चौकशी सुरू केली आहे. दोघंही एकाच कंपनीत जॉब करत होते. त्यावेळी दोघांमध्ये खूप चांगली मैत्री झाली आणि जवळीक वाढली. हे दोघंही एकमेकांसोबत लग्न करू इच्छित होते. युवकाने युवतीला अंगठीही दिली होती. परंतु मुलीच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या युवकासोबत ठरवलं. घरच्यांना विरोध न करता युवतीही लग्नासाठी तयार झाली. ही बाब युवकाला समजताच त्याला सहन झालं नाही आणि त्याने मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्याकडे बंदूक कुठून आली याचा तपासही पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here