महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघाची पुणे जिल्हा बैठक उत्साहात

पुणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – कोरोनाच्या कठीण परिस्थिती नंतर हिरङे बॅकेट हाॅल मुळशी पुणे येथे संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली, सदर बैठकीत महाराष्ट्र कोअर कमिटीच्या अध्यक्षपदी व्यंकटेश जाधव यांची निवङ जाहीर करण्यात आली.यावेळी जितेंद्र गवारे या एव्हरेस्ट वीराचा सत्कार विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला .

संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद पवार यांच्या प्रयत्नाने पुण्यातील उद्योजक व्यंकटेश जाधव यांची संघात दमदार एन्ट्री झाली तसेच यावेळी विनोद वैष्णव( पश्चिम महाराष्ट्र विभागीय.उपाध्यक्ष),सुप्रिया बनसोडे (महिला सहसचिव),ॠषभ पाटील (विभागीय संघटक),संदिप पाटील(प्रसिद्धी प्रमुख),रिषभ तोमर(जिल्हा अध्यक्ष),प्रेम मिश्रा(प्रसिद्धी प्रमुख),अंजली जनगाम(उपाध्यक्ष),दिप्ती शहा(महिला उपाध्यक्ष),मिनू भोसले, कार्याध्यक्ष प्राची भगत संघाच्या महिला प्रसिद्धीप्रमुख रूपाली ढोमसे आदि पदाधिकारी निवडण्यात आले.संघाच्या माध्यमातून सर्वानी आपली जबाबदारी पार पाङण्याच्या सूचना देण्यात आल्या.

purogami-sangh-meeting

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची भगत यांनी केले तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी राज्य सचिव प्रवीण परमार, .सागरभाऊ गवळी (नगरसेवक PCMC), सोमनाथ पांचाळ (API भोसरी MIDC), अनिलशेठ फुगे (सामाजिक कार्यकर्ते भोसरी), अनिलशेठ लांडगे (संस्थापक भैरवनाथ विद्यालय भोसरी), अमोलशेठ आराख (समाजसेवक भोसरी), इंद्रजित भोसले (दिव्य क्लासेस भोसरी), निळकंठमामा बिराजदार(भारत गैस सप्लायर्स), प्रदेशाध्यक्ष विनोद पवार, उपाध्यक्ष प्रकाश चितळकर, महिला अध्यक्षा सुनीता तोमर, उपाध्यक्ष दीप्ती शहा, क्रीडा समितीचे अध्यक्ष फिरोज खान, महाराष्ट्र प्रसिद्धीप्रमुख विजय म्हात्रे तसेच श्याम दाभाडे, अमोल सोनार असे अनेक मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती संस्थेचे राज्य सचिव प्रवीण परमार यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here