प्रा. बी.एन.चौधरींचा वाढदिवस उत्साहात साजरा.
धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – शिवसेना सदैव विधायक कामात अग्रेसर असते याचा प्रत्यय आज धरणगावकरांना आला. पाठीवरती हात ठेवून लढ म्हणा ही परंपरा चालवणारे कवी प्रा. बी. एन. चौधरी यांच्या हस्ते शिवसेनेने संसार उध्वस्त झालेल्या, गरजवंतांना मदतीचा हात दिला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धरणगाव शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. यात शहरातील मातोश्रीनगर परिसरालगत असलेल्या हामाल वाड्यातील घरांमध्ये पाणी शिरून, घरातील संसारोपयोगी सामान व इतर साहित्याचे बरेचसे नुकसान झालेले आढळून आले. या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून आज प्रसिद्ध लेखक, साहित्यिक, कवी प्रा. बी एन चौधरी व सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने, शिवसेना शाखा धरणगाव तर्फे पिडीत कुटुंबाला संसार उपयोगी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले,
सदर कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ व उपजिल्हाप्रमुख पी एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. शहरातील नामवंत 105 वर्षांची परंपरा असलेली प.रा विद्यालयातील विद्यार्थीप्रिय व्यक्तीमत्व असलेले माजी मुख्याध्यापक व प्रसिद्ध कवी, व्यंगचित्रकार सामाजिक कार्यकर्ते , कोणत्याही कामात अग्रेसर असणारे प्रा. बी .एन. चौधरी व अनिलश बडगुजर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संबंधित गरजूं कुटुंबाना किराणा साहित्याचे त्यांच्याच हस्ते वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला गुलाबराव वाघ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करताना प्रा. चौधरी यांना महामहीम तात्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मार्मिक व्यंगचित्रकार पूरस्काराने गौरविण्यात आले होते त्या आठवणींना उजाळा दिला.
आभार मानतांना प्रा. चौधरी म्हणाले कि, कुटूंबामधे तर वाढदिवस साजरा होतो पण माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाचा वाढदिवस एखादी संघटना विधायक उपक्रम करुन ज्यांचा संसार उद्ध्वस्त झाला अशा लोकांना माझा हस्ते एक महिना पुरेल एवढा किराणा देते याचापेक्षा मोठा आनंदाचा दुसरा क्षणच असु शकत नाही. या कार्यक्रमाला गटनेते विनय भावे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन, भागवत चौधरी, अजय चव्हाण, अहमद पठाण, जितेंद्र धनगर, त्याचप्रमाणे तालुका उपप्रमुख राजेंद्र ठाकरे, विभाग प्रमुख संजय चौधरी उपस्थित होते.
धरणगाव शिवसेना आपल्या सोबत कायमच आहे. आम्ही आपले अश्रू पुसणारच ! आता फक्त रडायचे नाही तर,लढायचे आहे. कोरोना शी, संकटांशी, अडचणींशी. येत्या काळात अजून योग्य ती मदत आम्ही निश्चितपणे करण्याच्या प्रयत्न करू असे जळगाव लोकसभा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ म्हणाले.
या कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन किरण मराठे,योगेश पी.पाटील,तोसिब पटेल,वाल्मीक पाटील,विनोद महाजन, गोपाल पाटील,गोपाल चौधरी,यांनी केले. किराणा साहित्य आणुन गरजु लोकांना पोहचविण्यासाठी अरविंद चौधरी,योगेश पी.पाटील,पवन पाटील किशोर पाटील,सोनू पटेल,महेंद्र चौधरी इत्यादी शिवसैनिकांनी मदत केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविका लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी आपण स्वतः प्रा. चौधरी यांचे विद्यार्थी असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. सरांचा आदर्श आम्ही कामात आणतोय असं ते म्हणाले. आभार प्रदर्शन शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र महाजन व किरण अग्नीहोत्री यांनी मानले.






