जनकल्याण समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने कोरोना योद्धांचा सत्कार

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) – जनकल्याण समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार परमहंस नगर व्यवस्था प्रमुख  गिरीश गांधी यांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

कोरोना काळात जीवाची पर्वा न करता यावेळी खिचडी वाटप, शिधावाटप, पोळी भाजी ( टिफीन) मास्क तयार करणे ही कामे अखंडपणे चालू होती. यावेळी जयवंत दहिभाते, रुपेश भुरवणे, श्रेया पालांडे, रुपाली मुरमुरे या योद्धांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी माधव बाग प्रभात शाखेचे चंद्रकांत नामजोशी, अजित कुलकर्णी, डॉ. मुकुंद कुलकर्णी, मोहन चाबुकस्वार, मुकुंद कुलकर्णी, प्रद्युभ्न नाडगौडा, तेजस भुवड, विजय पालांडे, अनिता तलाठी  इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here