‘अल्लाहू अकबर’ म्हणत भर रस्त्यात तरुणाने केला चाकू हल्ला; तिघांचा मृत्यू

बर्लिन (जर्मनी) – येथे शुक्रवारी एका तरुणाने भर रस्त्यात चाकूने लोकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यामध्ये लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बायर्न राज्यातील वुर्जबर्ग शहरात घडली.

पोलिसानी या हल्ल्याबाबत ट्विटरवर माहिती देताना सांगितले की, हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तरुणाच्या मांडीवर निशाणा साधत गोळीबार केला. यानंतर त्याच्यावर ताबा मिळवत त्याला अटक केली. पोलिसांनी हल्लेखोराबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. परंतु त्याचा फोटो प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केला असून फोटोमध्ये तरुण हातामध्ये चाकू घेऊन आणि लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत. हल्ल्यावेळी आरोपीने ‘अल्लाहू अकबर’चा नारा दिला. तो अरबी भाषेत बोलत होता, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले

राज्याचे गृहमंत्री जोआकिम हेरमन यांनी या हल्ल्यानंतर घटनास्थळी भेट दिली. हल्ला करणारा तरुणी 2015 पासून वुजबर्गमध्ये वास्तव्यास होता. त्या वेळी जर्मनीने स्थलांतरित आणि निर्वासितांसाठी आपली सीमा उघडली होती. हल्ला करणारा तरुण या स्थलांतरितांपैकीच एक असण्याची शक्यता आहे. तसेच तरुण मनोरुग्ण असून काही महिन्यांपूर्वी मनोरुग्णालयात त्याने उपचारही घेतले होते, अशी माहिती हेरमन यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here