खुलताबाद (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाकडून खुलताबाद रोडवर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी समाजाला राजकीय व इतर आरक्षण मिळणेबाबत निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाला राजकीय दृष्ट्या आरक्षण होते ते आरक्षण रद्द झाल्यामुळे वर्षानुवर्ष अपेक्षित असलेले समाजा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर लोटल्या गेला या समाजाने आतापर्यंत प्रचंड हाल अपेष्टा सहन केल्या असून समाज गरिबीमध्ये खितपत पडलेला आहे तरी महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला जाग येण्यासाठी आम्ही हे मागण्याचे निवेदन देत आहोत.
महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी या निवेदनात आघाडी सरकारने त्वरित ओबीसी आयोग नेमून ओबीसी समाजाची जनगणना करावी व २७ टक्के राजकीय व इतर आरक्षण पुन्हा द्यावे, आयोगाने शिफारस केलेले प्रतिनिधित्व जास्त असल्यामुळे संविधानाने सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेली मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घ्यावी, ओबीसी नसतानी ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन आरक्षणाचा फायदा घेतलेल्यांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका रद्द करण्यात याव्या अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी एल.जी. गायकवाड जिल्हा परिषद जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे तालुकाध्यक्ष गणेश नाना गाणे सभापती दिनेश अंभोरे माजी सभापती ज्ञानेश्वर नलावडे जिल्हा सरचिटणीस गणेश राजू रावत तालुका अध्यक्ष ओबीसी शिवनाथ गायके तालुका सरचिटणीस ओबीसी प्रकाश चव्हाण माजी उपसभापती युवराज ठेंगडे उपसभापती राहुल निकम प्रभाकर शिंदे सुरेश मरकड अविनाश नाना परसराम बारगळ प्रभाकर शिंदे संतोष घुसून गे विलास काळे योगेश बारगड सुमित चाबुकस्वार सागर मतकर मुक्तार पठाण सत्तार पटेल दत्तू गोरे किशोर भाऊ सर आनंदा काटकर सतिष दांडेकर शहराध्यक्ष खुलताबाद आशिष कुलकर्णी हरिचंद्र राजपूत वसीम शेख विजय राठोड संदीप निकम युवा अध्यक्ष आदी उपस्थित होते.






