चक्का जाम आंदोलनात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याबद्दल गुन्हा दाखल

पुण्यात भाजपा नेत्यांसह १०० ते १५० जणांवर गुन्हा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – राज्यभरात भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मात्र पुण्यात भाजपानं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान कोरोनाचे नियम मोडल्याचं दिसून आल्याने, आयोजकांसह भाजपा नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील कात्रज चौकात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन पार पडले. या आंदोलनात जवळपास २०० हून अधिक भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी कोरोना नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन करण्यात आलं नव्हतं. .

पोलिसांनी ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाकारली होती. त्याबरोबर कोरोनाचे नियम पाळून आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र आंदोलनाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणे, रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी केल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आयोजकांसह १०० ते १५० जणांवर कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here