गावठी पिस्तुल बाळगणारा रामानंद पोलिसांच्या ताब्यात

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) – शहराच्या पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या तरुणास रामानंद नगर पोलिसांच्या पथकाने काल (दि.२५) रात्री १० वाजेच्या सुमारास अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंप्राळा परिसरातील भवानी मंदिराजवळ गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या महेश वासुदेव पाटील (रा.हिराशिवा कॉलनी) यास पिस्तुल व रिकाम्या मॅगझीनसह ताब्यात घेण्यात आले.

याप्रकरणी सागर देवरे यांच्या फिर्यादीवरून रामानंद रामानंद नगर पोलिस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि दीपक बिरारी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here