मैंदर्गीत छत्रपती प्रतिष्ठानच्यावतिने जिल्हा परिषद व हायस्कूल शिक्षक यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) – वृक्ष लागवड महासंकल्पनेत मैंदर्गी येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुलांची व मुलींची शाळा, श्री शिवचलेश्वर हायस्कूल मैंदर्गी तसेच आदर्श प्राथमिक शाळा येथील शिक्षकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने १००१ वृक्ष लागवड करण्याचा संकल्प हाती घेतले आहे गेल्या काही दिवसा पासून वृक्ष लागवड केली जात आहे. या संकल्पनेत युवा पिढीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे.झाडाचे महत्व आपल्या आयुष्यात किती महत्वाचे आहे हे नागरिकांना माहीत झाले आहे.

tree-plantation-at-maidargi

यावेळी संकल्प प्रतिष्ठान मैदंर्गी चे अध्यक्ष मल्लिनाथ सलगर, नागराज अडाकूल, मल्लीकार्जून कुंभार तसेच जि.प.प्रा.कन्नड शाळेचे मुख्याध्यापक श्री. हडलगी सर, मुख्याध्यापक श्री. टोणगे सर, श्री. जुजगार सर, श्री. गोब्बूर सर श्री.शिवयोगी शिवचलेश्वर हायस्कूल चे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. हिरेमठ सर, पर्यवेक्षक श्री.देशेट्टी सर, माजी मुख्याध्यापक अळ्ळोळी सर, श्री.निंबाळ सर, श्री. आरेनवरू सर, श्री हरवाळकर सर, श्री.सवळी सर, श्री. काळे सर, श्री. केंगनाळकर सर, श्री. पाटिल सर, श्री. मुन्नोळी सर, श्री. पराड सर, शिपाई श्री.स्वामी व श्री. आजुरे यांच्यासह आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बसवंतराय काळे सर, श्री. कुसगुले सर आदी उपस्थित राहून वृक्षारोपण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here