मारहाण करणाऱ्याला सिंहगड पोलीसांची अटक
पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – लाईट बिल थकविल्यामुळे विद्युत जोडणी बंद करत असाताना वायरमनला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी एकाला सिंहगड पोलिसांनी अटक केली आहे. रविंद्र सुधाकर चव्हाण (वय ४५,रा.धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश माने (वय 30,रा. हडपसर) यांनी तक्रार दाखल केली आहे. ही घटना रविवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास धायरी येथे घडली आहे.
रवींद्र महावितरणमध्ये वायरमन म्हणून काम करतात. त्यांचे वरिष्ठ अधिकारी सहायक अभियंता बडसे यांनी धायरी भागातील थकबाकी धारकांची यादी व थकीत ग्राहकांची वीज जोडणी तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रवींद्र आरोपी चव्हाण याच्या घरी गेले होते.
चव्हाण यांनी मागील एक वर्षापासून ८८ हजाराचे विजबील थकविले आहे. पथकाने त्यांची जोडणी तोडत असताना चव्हाण घराबाहेर आले. तुम्ही माझी वीज जोडणी का तोडता असे म्हणून रवींद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ केली. रवींद्रला मारून ढकलून दिले. तुम्हाला पाहून घेतो अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तनपुरे करीत आहेत.






