इस्रायलकडून गाझावर एअर स्ट्राइक

शस्त्रसंधीनंतर ही इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील हमास दरम्यानचा संघर्ष सुरुच

तेल अविव : इस्रायली सैन्याने गाझा पट्टीमधील हमासच्या ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ले केले. इस्रायलच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार पॅलेस्टिनी भागातून ज्वलनशील पदार्थ असलेले बलून बॉम्ब सोडण्यात आले होते. त्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलने रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली.

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. गाझा पट्टीत हमासच्या ठिकाणांना आणि शस्त्राच्या कारखान्यांना लक्ष्य करण्यात आले असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले. तर, इस्रायलच्या हवाई हल्ल्यावर हमासने देखील कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

मागील आठवड्यात इस्रायलने गाझापट्टीवर काही निर्बंध शिथिल केल्यानंतर बलून बॉम्ब हल्ल्यात घट झाली होती. मात्र, एक जुलै रोजी पुन्हा एकदा बलून बॉम्ब हल्ला करण्यात आला. त्यामुळे सीमालगतच्या भागात आग लागली. दरम्यान, इजिप्त आणि संयुक्त राष्ट्र संघाने इस्रायलकडून होणारे हल्ले आणि गाझा पट्टीतून होणारे बलून हल्ल्याबाबत मध्यस्थी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here