दोंडाईचा (प्रतिनिधी) : युवासेनाप्रमुख तथा कॅबिनेट मंत्री ना. आदित्यसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना विषाणूंचा पार्श्वभुमीवर संभाव्य धोका लक्षात घेता दोंडाईचातील महादेवपुरा परिसरात धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व युवासेनेचे जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे यांचा मार्गदर्शनाखाली मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.
या शिबीरामध्ये १) CBC MP २) HBA1C HB ३) Electrophoresis ४) SERUM ५) CREATININE, ६) BILIRUBIN, ७) TD SGPT, ८) SGOT ९) CALCIUM १०) LDH, ११) RH FACTOR, १२) TSH T3 T4 अशा अनेक खर्चिक रक्ततपासन्या मोफत करण्यात आल्या, कार्यक्रमाची संकल्पना युवासेना तालुका प्रमुख आकाश कोळी यांची होती. तर त्याला यशस्वी करण्यासाठी शिवसेना युवासेना दोंडाईचा शहर व शिरपुर महालॅबचे मोठे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश कोळी यांनी केले तर उपतालुका प्रमुख शैलेश सोनार यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे विभागीय तालुका प्रमुख ईश्वर पाटील, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, शहर संघटक राकाशेठ रुपचंदाणी, युवासेना तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, उपशहरप्रमुख, योगेश बोरसे, सुरेश कोळी, महालॅबचे गणेश विसावे, योगेश पाटील, हेमंत पाटील, संदीप भोई, अमोल पाटील, शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते, दिपक मराठे, राज ढोले, चेतन साबळे, जितु कोळी, राहुल रामराजे, संदीप तिरमले, देवेंद्र अहिरे, संजय कोळी, चतुर कोळी, अनिल कोळी, विशाल कोळी, सचिन कोळी, सागर कोळी, आकाश चौधरी, विश्वजित राजपूत, प्रणव सुतार व परिसरातील नागरिक शिवसैनिक, युवासैनिक आदी उपस्थित होते.



