मुंबई शहर कामगार उप आयुक्तांमार्फत घरेलु कामगारांना माहिती अद्ययावत करण्याबाबत आवाहन

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळामार्फत नोव्हेबर 2011 ते 31 मार्च 2014 पर्यंत घरेलु कामगारांची नोंदणी मॅन्युअल पध्दतीने करण्यात आली होती.मॅन्युअल नोंदणी दरम्यान घरेलु कामगारांचे बँकेचे तपशील घेण्यात आलेले नव्हते.

त्यामुळे या कालावधीत आणि यानंतर नोंदणी केलेल्या सर्व घरेलु कामगारांनी आपली माहिती http://public.mlwb.in/public या लिंकवर अद्ययावत करावी, असे आवाहन कामगार उप आयुक्त, मुंबई शहर यांच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच नोंदणी करतांना अडचण आल्यास कामगार उप आयुक्त कार्यालय, मुंबई शहर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here