संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची चेअरमन म्हणून निवड
शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : महाराष्ट्रातील नावाजलेली संस्था म्हणून नावलौकिक असलेली शिर्डीतील साईबाबा संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या विद्यमान चेअरमन व्हॉईस चेअरमन यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामे दिल्याने त्या रिक्त पदांसाठी आज निवडणूक घेण्यात आली.
त्यात सौ.श्रद्धा विजय कोते यांना 8 विरुद्ध 3 मताने चेअरमन म्हणून तर दिनेश दिलीप कानडे यांची एकच अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध व्हॉईस चेअरमन म्हणून निवड करण्यात आली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पार पडली असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राहता येथील सहाय्यक निबंधक श्री.जितेंद्र शेळके यांनी कामकाज पाहिले यावेळी संस्थेचे संचालक यादवराव कोते, संदीप बनसोडे,तुषार शेळके,प्रतापराव कोते,जितेंद्र गाढवे,विलास गोंदकर,विठ्ठल पवार,मिरा कोटकर,दीपक धुमसे,सचिव नबाजी डांगे,सहसचिव विलास वाणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
संस्थेच्या त्रिसमितीच्या काळात अध्यक्ष म्हणून काम करतांना आपल्या कार्याची चुणुक दाखवत श्रद्धा कोते यांनी संस्थेचा कारभार उत्तमरीत्या संभाळल्याची पावती म्हणून संस्थेचे मार्गदर्शक खासदार सुजय विखे यांनी पुन्हा एकदा श्रद्धा कोते यांना चेअरमन म्हणून संस्थेचा कारभार सांभाळण्याची संधी दिली.
खासदार सुजय विखेंनी माझ्यावर विश्वास दाखवत जी जबाबदारी सोपवली आहे ती मी प्रामाणिकपणे तसेच सर्वांना सोबत घेऊन यशस्वीपणे सार्थ करून दाखवीन असे यावेळी नूतन चेअरमन श्रद्धा कोते यांनी सांगितले. संस्थेच्या इतिहासात प्रथमच एका महिलेची चेअरमन म्हणून निवड झाल्याने श्रद्धा कोते यांचा सत्कार करण्यास विजय कोते,सचिन तांबे,दीपक वारुळे,दत्तात्रय गोंदकर,बापू ठाकरे,धीरज समदडिया,मुकुंद गोंदकर,अरुण सहारे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते






