कन्हैय्या मॅरेथॉनमध्ये गोविंद पाडेकर, प्रिया गुळवे, तेजस गुळवे व आदिती हारगुडे ठरले विजेते

कन्हैय्या मॅरेथॉन

अहिल्यानगर (उपसंपादक दिपक वरखडे) | प्रसिद्ध कन्हैया उद्योग समूह व कन्हैया सोशल फाउंडेशनच्या वतीने उद्योजक सुरेश पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘कन्हैया मॅरेथॉन २०२६’ स्पर्धेत नाशिकचा गोविंद पाडेकर, अळकुटीची प्रिया गुळवे, तेजस गुळवे आणि आदिती हारगुडे यांनी विविध गटांत दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे.

राळेगणसिद्धी ते पिंपळनेर मार्गावर रविवारी (दि. ४) पहाटे पार पडलेल्या या स्पर्धेत राज्यभरातून विविध वयोगटांतील सुमारे ८०० महिला व पुरुष धावपटूंंनी अत्यंत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कन्हैया सोशल फाउंडेशनच्या वतीने रविवारी पहाटे ५ वाजता या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात राळेगणसिद्धी ते पिंपळनेर मार्गावर धावपटूंचा उत्साह पाहायला मिळाला. या राज्यस्तरीय स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील क्रीडाप्रेमी आणि युवकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला होता.

स्पर्धेतील विजयी धावपटूंचा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करून गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. विखे पाटील यांनी, “युवकांनी आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्राधान्य देत अशा क्रीडा उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहन केले. निरोगी समाज घडविण्यासाठी नियमित व्यायाम, धावणे आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, जी.एस. महानगर बँकेच्या अध्यक्षा गितांजली शेळके, कन्हैया सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक मच्छिंद्र लंके, उद्योजक सुरेश पठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, भाजपचे मंडलाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत गायकवाड, विजय औटी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे, मंडलाध्यक्ष दिनेश बाबर, सचिन शेळके, राजेंद्र शेळके, नितीन अडसूळ, अभय औटी, विठ्ठल पवार यांच्यासह इतर मान्यवर, स्पर्धक, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.

डॉ. सुजय विखे पाटील यांनी उद्योजक सुरेश पठारे आणि उद्योजक मच्छिंद्र लंके यांच्या कार्याचे कौतुक केले. स्वकर्तृत्व आणि कष्टाच्या जोरावर उद्योग-व्यवसायात भरारी घेत ग्रामीण भागात उद्योग उभे करून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देता येतात, याचे उत्तम उदाहरण त्यांनी निर्माण केले आहे, असे ते म्हणाले. कन्हैय्या उद्योग समूहाने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागात उद्योगाचा विस्तार करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिल्याचे त्यांनी नमूद केले.

१० किलोमीटर (मुले): प्रथम – गोविंद पाडेकर (नाशिक), द्वितीय – अनिल जाधव, तृतीय – अमोल अमोने (सोलापूर). १० किलोमीटर (मुली): प्रिया गुळवे (अळकुटी), जान्हवी रोजडे (जळगाव), दिपाली डोळस (विरोली, पारनेर). ५ किलोमीटर (मुले): तेजस भुसारे (नाशिक), कृष्णा गायके (अहिल्यानगर), सौरभ बांगर. ५ किलोमीटर (मुली): आदिती हरगुडे (वाघोली), ज्ञानेश्वरी लामखडे (अळकुटी), आकांक्षा देशमुख (रांजणगाव मस्जिद). ३ किलोमीटर (मुले): सनी पद्माकर, कोडी, अक्षय बागुल, तनिष इंदोरे. ३ किलोमीटर (मुली): अदिती भड (वाघोली, पुणे), प्रांजळ जाधव (अळकुटी), प्रिती खामकर (अळकुटी).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here