जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | भारतीय जनता पार्टी, जळगाव महानगरच्या महिला बलूतेदार जिल्हाध्यक्ष पदावर सौ. पुनमताई दीपक खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे पत्र भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांच्या हस्ते सौ. खैरनार यांना प्रदान करण्यात आले.
राज्य पातळीवरील आणि स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे भाजपच्या महिला आघाडीला आणि बालूतदार घटकांच्या संघटन बांधणीला अधिक बळकटी मिळणार असून, राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ही नियुक्ती राज्याचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजयजी सावकारे, विभागीय संघटनमंत्री रविंद्रजी अनासुपरे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार नंदकिशोर महाजन, आमदार सुरेश (राजूममा) भोले, आमदार मंगेशदादा चव्हाण आणि आमदार अमोलजी जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या एकनिष्ठ व सक्रिय कार्यकर्ता म्हणून सौ. पुनमताई खैरनार यांनी यापूर्वी अनेक पक्षांतर्गत जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी आतापर्यंत केलेल्या प्रभावी संघटनात्मक कामाची दखल घेऊनच पक्षाने त्यांच्याकडे ही महत्त्वाची धुरा सोपवली आहे. भविष्यात त्या पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक जोमाने वाढवतील, असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
राष्ट्र प्रथम, एकात्म मानववाद, अंत्योदय, मूल्याधारित राजकारण या भाजपच्या विचारसरणीवर दृढ विश्वास ठेवून पक्ष शिस्त, संघ भावना व परस्पर सहकार्य या त्रिसूत्रीचे पालन करत त्या आपले कार्य चालू ठेवतील, अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी आपल्या नियुक्ती पत्रात व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस व सामाजिक-राजकीय प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.







