धरणगाव (तालुका क्राईम रिपोर्टर ज्ञानेश्वर महाडिक) – नॅशनल हायवे क्रमांक 6 वर गाड्या अडवून लुटमारीच काम करणाऱ्या 3 जणांच्या मुसक्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी आवळल्या आहेत.
याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भरत तिवारी(वय 26 ),अक्षय शामकांत कुलकर्णी(वय 23 ),आवेश शेख बिस्मिल्ला(वय 20 ),अशी तीन आरिपींचीनावे आहेत.यातील भरत हा नारखेडे शाळेजवळ तापी नगर येथे राहतो.तर अक्षय कुलकर्णी हा आरोपी नारायण नगर तर आरोपी आवेश हा जिया कॉलनी येथे वास्तव्यास आहे.पोलिसांनी मुज्जीमल शेख कलीम(वय 19 )यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत असे की,भुसावळ ते जळगाव दरम्यानच्या हायवेवर काही चोरटे गाड्या अडवून नागरिकांनी जीवे मारण्याची धमकी देऊन लुबाडत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी तातडीने वेळ न दडवता नॅशनल हायवे क्रमांक 6 वर धाव घेतली. पोलीस हायवेवर ब्रिजजवळ पोहोचले तेव्हा तिथे पाच इसम हातात हत्यारे घेऊन लुटमारीच्या तयारीत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं.पाचही जणांकडे लुटमारीसाठी आवश्यक असणारे सर्व हत्यारे होते.पोलिसांनी तात्काळ आरोपींना ताब्यात घेतलं.
पोलिस आल्याच कळताच काही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.पण पोलिसांनी तिघांना पकडलं.तरीही दोन आरोपी पळून जाण्याचा प्रयत्नात यशस्वी झाले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






