दि. ४ जुलै राशिभविष्य : या राशीतील लोकांच्या प्रयत्नांना आज लाभेल यश

    मेष : बघायला गेलं तर कार्यक्षेत्रात होणाऱ्या किंवा झालेल्या बदलांची तुम्हाला कधीही भीती वाटत नाही. परंतु आज असे काही बदल सरकारच्या किंवा यंत्रणेच्या बाजूने असतील, ज्यामुळे तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो. हार मानण्यापेक्षा हे चांगले होईल, जी काही समस्या असेल त्यामधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

    वृषभ : तुम्ही नेहमी दुसर्‍यांवर अवलंबून असता. जर इतरांनी काम केले तरच तुम्ही सुद्धा काम कराल अन्यथा नाही. तुम्हाला ही सवय बदलावी लागेल. अन्यथा तुमचा पराभव होईल. ही भावना फक्त नुकसान पोहोचवते. त्यापेक्षा मेहनत करणे कधीही चांगले. याला थोडा वेळ लागेल परंतु तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

    मिथुन : आज काही लोकं तुमच्या कामात अडचणी निर्माण करू शकतात. तुम्ही त्यांच्यावर नाराज होऊ शकता. कामे पूर्ण करण्याआधीच तुम्ही हार मानू शकता. परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही या समस्या डावलण्यास सुरुवात केली तर तुम्ही कधीही प्रगती करण्यास सक्षम होऊ शकणार नाही. एखाद्या वरिष्ठांचा सल्ला घेणे आणि त्यांच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल.

    कर्क : समाज सेवा हे असे क्षेत्र आहे जिथे तुमच्या राशीतील लोकांसाठी दुप्पट तिप्पट प्रगती होऊ शकते. तुम्ही एखाद्या संस्थेशी संलग्न असल्यास, ते चांगले आहे. आज तुमच्याकडे बर्‍याच संधी असतील, ज्याद्वारे तुम्हाला आयुष्यात यश मिळू शकते. गुंतवणूक देखील फायदेशीर ठरू शकते.

    सिंह : तुमच्या प्रयत्नांना यश मिळायला सुरुवात होईल. आज तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या अधीनस्थ सहकाऱ्यांप्रती तुमचे वर्तन उदार असेल आणि तुम्ही त्यांच्या सर्व चुका माफ करण्यास तयार असाल. परंतु भूतकाळातील अनुभवांमधून शिका. जेणेकरून कोणीही तुम्हाला पुन्हा त्रास देणार नाही.

    कन्या : आज तुम्ही तुमच्या मित्र आणि प्रियजनांच्या कल्याणासाठी चिंताग्रस्त होऊ शकता. तुम्ही स्वतःचे कार्य सोडून इतरांच्या कार्यात सहभागी होऊन तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवित आहात. ही सवय मोडायला हवी. आज तुम्हाला स्वतःबद्दल अधिक विचार करावा लागेल. कामाची परिस्थिती अनुकूल आहे.

    तूळ : आज कामाच्या ठिकाणी इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी तुमच्या परिश्रमांवर लक्ष द्या. केवळ याचाच तुम्हाला फायदा होईल, अन्यथा तुम्हाला कार्यक्षेत्रात प्रचंड तोटा सहन करावा लागू शकतो. आज कार्यालयात कुटूंबातील सदस्यांसोबत किंवा सहकाऱ्यांशी वाद असू शकतात. यामुळे मन दु:खी होईल.

    वृश्चिक : आज भावनिक आणि हृदयाशी संबंधित काही गोष्टी तुमच्यासमोर येतील. परंतु जर तुम्हाला काही निर्णय घ्यायचा असेल तर काळजीपूर्वक घ्या, अन्यथा तुमची भावना आणि औदार्य तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकेल. कोणत्याही प्रकारचे न्याय धोरण किंवा कायद्याशी संबंधित समस्या असल्यास घाईगडबड टाळणे चांगले. एखाद्याचे विचारपूर्वक मत घेतल्यानंतरच पुढे जा.

    धनू : बराच काळानंतर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. महत्त्वाचे काम झाल्याने फायदेशीर संधी मिळतील. याखेरीज आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तसेच, विपरीत लिंगाच्या व्यक्तीबरोबर झालेली भेट आनंददायक भावना निर्माण करेल. भागीदारीत लाभ होऊ शकेल.

    मकर : आज तुम्ही अनेक प्रकारच्या शंकाकुशंकांमध्ये व्यस्त असाल. एकीकडे प्रियकरासाठी किंवा प्रिय व्यक्तीसाठी कोणतीही वस्तू किंवा भेटवस्तू खरेदी करण्याची घाई असेल. दुसरीकडे, कामाच्या ठिकाणीही ताण जास्त असेल. योग्य वेळी नेमके तुमचे वाहन तुम्हाला साथ देणार नाहीत. अशा वेळी तुमची स्वतःची बुद्धिमत्ता उपयोगात येईल.

    कुंभ : आज औदासिन्य आणि संशयाचे ढग तुमच्या आजूबाजूला जमा होतील. यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. घरात शांततेचे वातावरण असेल. आई-वडिलांसोबत चांगला काळ घालवा. तसेच, तुमच्या दैनंदिन कार्यात काही अडथळे येऊ शकतात. आज तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील. अधिकाऱ्यांसोबत वाद देखील होऊ शकतात.

    मीन : संतांच्या आश्रयामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुम्ही राग येईल अशा गोष्टींवर चर्चा करून सुद्धा तुम्हाला राग येणार नाही. यासह तुम्ही बिघडलेले वातावरण आणखी चांगले करण्यास सक्षम असाल. तसेच, आज विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये काही अडचणी येऊ शकतात. अचानक पैसे खर्च करावे लागतील. पण शेअर-सट्टेबाजीपासून दूर रहा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here