फिलिपीन्समध्ये सैन्याचं विमान कोसळलं, १५ जणांची सुखरुप सुटका

फिलिपीन्स : येथे लष्करी विमान कोसळल्याची माहिती मिळाली आहे. अपघात झाला त्यावेळी विमानात ८५ जण होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळावर बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे.

फिलिपीन्सचे सैन्य प्रमुख सिरिलिटो सोबेजाना यांनी सांगितले की, हा अपघात दक्षिणी फिलिपिन्समध्ये झाला. मीडिया रिपोर्टनुसार आतापर्यंत १५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी हे विमान सुलू राज्यातील जोलो बेटवर उतरण्याचा प्रयत्न करत होते.

मदत व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात कमी लोकांचा नुकसान झालं पाहिजे अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत. त्यापैकी बहुतेकांनी नुकतीच बेसिक लष्करी प्रशिक्षण घेतले होते, असं सिरिलिटो सोबेजाना म्हणाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here