अकरा हजाराच्या उंबरठ्यावर पोहचला कोरोनाबाधितांचा आकडा

जळगाव – जिल्ह्यातील कोरोना संशयितांचे स्वॅब तपासणीचा आज (दि.३०) मिळालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज नव्याने 267 कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 10 हजार 858 झाली आहे. सर्वाधिक 86 कोरोबाधाीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात 271 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर 86, जळगाव ग्रामीण 23, भुसावळ 8, अमळनेर 4, चोपडा 16, पाचोरा 18, भडगाव 7, धरणगाव 9, यावल 12, एरंडोल 5, जामनेर 14, रावेर 2, पारोळा 15, चाळीसगाव 28 अशी रूग्ण संख्या आहे. दिवसभरात 13 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर 3, अमळनेर, यावल आणि जळगाव तालुक्यात प्रत्येकी 2 , पाचोरा, चोपडा, पारोळा, रावेर तालुक्यात प्रत्येकी 1 याप्रमाणे बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय महाविद्यालय व तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here