राज्य व केंद्र सरकारने धनगर आरक्षण बाबत देखील आपली भूमिका स्पष्ट करावी – कल्याणी वाघमोडे

ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण नको : ओबीसींच्या रोषामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ दिल्या जाणार नाहीत

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आपण सध्या चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या खडाजंगी सुरू आहेत. वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसी उठाव पाहायला मिळत आहे . सर्व ओबीसी संघटनाकडून दाद मागण्यासाठी आंदोलन ,मोर्चे द्वारे निवेदन देण्यात येत आहेत .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसेच उपमुख्यमंत्री ,ओबीसी कल्याण मंत्री ,सामाजिक न्यायमंत्री यांना मेल द्वारे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी आरक्षणाचे फक्त राजकारण सत्ताधारी व विरोधी पक्षांनी करू नये तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे धनगर आरक्षण बाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी ,दुरुस्ती अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द करावा आणि केंद्र सरकारने ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील महाराष्ट्रात केलेल्या वक्तव्याला जागावे,असे मत कल्याणी वाघमोडे यांनी व्यक्त केले .

kalyani-waghmode

दि. ४ मार्च, २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘विकास किशनराव गवळी वि. महाराष्ट्र सरकार (रिट याचिका क्र. ९८०/२०१९)’ या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचे आरक्षण रद्दबातल ठरविले. याबाबतची राज्यसरकारची फेरविचार याचिकासुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दि. २८ मे रोजी फेटाळली आहे.

राज्यशासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती, तर आरक्षण रद्द झाले नसते. याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार आहेत. तरी कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण रद्द न होता अबाधीत राहिलेच पाहिजे. याची दक्षता व कार्यवाही राज्यशासनाने करावी. महाराष्ट्र शासनाच्या या अतिशय महत्त्वाचे राजकीय आरक्षण वाचविण्यात महाराष्ट्र शासनाचे अक्षम्य दिरंगाई केली. याला महाराष्ट्र शासन आणि विशेषत: ओबीसी कल्याण मंत्रालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून सर्व ओबीसी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .

ओबीसी चळवळीच्या मागणीवरून मंडल आयोग व घटना दुरुस्ती ७३ व ७४ ची अंमलबजावणी करून १९९४ साली हे आरक्षण लागू करण्यात आले होते . २७ टक्के आरक्षण राज्यातील सर्व भटके विमुक्त ,अ,ब,क,ड आणि विमाप्र,ओबीसी यांना एकत्रित मिळून होते . शिक्षण आणि शासकीय नोकरी यात भटके विमुक्त ,अ,ब,क,ड यांना
११ टक्के ,विमाप्र यांना २ टक्के , तर ओबीसी यांना १९ टक्के असे स्वतंत्र आरक्षण असले तरी राजकीय आरक्षण मात्र या तिघांनाही एकत्रित असे दिलेले आहे .व ते ३२ टक्के नसून २७ टक्केच आहे .त्यामुळे या सर्वांनाच एकाच मतदार संघातून निवडणूक लढवावी लागते . त्यांना वेगळे आरक्षण मिळत नाही .
राज्यातील सुमारे ३६ हजार ग्रामपंचायत ,३५० पंचायत समित्या ,नगर परिषद ,नगर पालिका ,३४ जिल्हा परिषदा, व २७ मनपा यात हे आरक्षण होते .

निवडणूक प्रचारापुरते ओबीसी ,धनगर मुद्दा घेणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१० ते २०१४ या काळात मनमोहन सिंग सरकारने केलेल्या आर्थिक ,शैक्षणिक ,सामाजिक जनगणनेचे आकडे उघड केले नाहीत . २०१४ ते २०१९ या काळात ओबीसी ,भटके विमुक्त ,विमाप्र यांची जनगणना केली नाही .त्यामुळेच सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात गेला .

या निवेदनात त्वरीत कार्यवाहीसाठी केलेल्या मागण्या :
१.वरील निकालाने राज्यातील सर्वच जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ‘नागरिकांच्या मागास प्रवर्गा’चे (ओबीसींचे) आरक्षणच धोक्यात आलेले आहे. ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१’ मधील सेक्शन १२(२)(क)मध्ये नागरिकांच्या मागासवर्गाच्या आरक्षणाची तरतूद असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार के. कृष्णमूर्ती वि. भारत सरकार या खटल्याच्या निकालात नमूद केलेल्या तीन अटींची पूर्तता राज्यशासनाने फार पूर्वीच करणे आवश्यक होते. जेणेकरून ओबीसी आरक्षण आज धोक्यात आले नसते. तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यशासनाने स्वतंत्र व समर्पित आयोग त्वरीत गठीत करून राज्यातील ‘नागरिकांच्या मागास प्र…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here