पडघा पोलीस ठाणे हद्दीत अनोळखी मृतदेह

ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

मुंबई (उपसंपादक प्रफुल शेलार) : पडघा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजि.नं.३१/२०२१ प्रमाणे दाखल करण्यात आले आहे.

मृत अनोळखी मृतदह पुरुषाचा असून, त्याचे अंदाजे वय ३० ते ३५ वर्षे आहे. उंची ५ फूट ६ इंच, मध्यम बांधा, गहू वर्ण, अंगात निळी जीन्स, सफेद लिनन कंपनीचा फुल शर्ट, पायात पांढरे कापडी बुट त्यावर केसरी रंगात नाईके कंपनीचा लोगा, गळ्यात काळ्या गोल मण्यांची माळ, दोन्ही पायात करगुटे बांधलेले तसेच डाव्या हाताच्या कोपरावर गोलकार टॅटू गोंदवलेला आहे. डाव्या हातात पिवळ्या धातूची अंगठी त्यात गुलाबी रंगाचा काचेचा खडा आहे.

वरील वर्णनाच्या अनोळखी इसमाची ओळख कुणाची ओळख असल्यास त्यांनी पडघा पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सहा.पोलीस निरीक्षक के.डी.बच्छाव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here