दि. ९ जुलै राशिभविष्य : चंद्र, सूर्य, बुध या ग्रहांबरोबर गुरुचा झालेला शुभ योग उजळेल या राशींचे भाग्य

    मेष : हा काळ कसोटीचा आहे. यावेळी तुम्हाला कामाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. आज तुमच्या कृतीमुळे लोकप्रियता वाढू शकते. तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवल्याने चांगले वाटेल.

    वृषभ: आज तुमचे वेळापत्रक खूप व्यस्त असेल. संध्याकाळ पर्यंत चांगली बातमी येईल. नफा देखील होईल. व्यावसायिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास तोटा टाळता येऊ शकतो. गुंतवणूकीच्या बाबतीत आज फायदा मिळू शकतो. प्रियकराला जास्त वेळ देऊ न शकल्यामुळे तक्रारी येतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. काहीतरी नवीन शिकायला मिळेल. तुमचे आरोग्यही चांगले राहील.

    मिथुन : आजचा दिवस उत्साहाने भरलेला असेल. दुपारपर्यंत ज्या फोनची बर्‍याच दिवसांपासून प्रतीक्षा करत होता तो फोन आज येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लक्ष अभ्यासाकडे वळवले तर त्याचा फायदा होईल. व्यापारी व्यवसायात नवीन तंत्रज्ञान आत्मसात करतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमीही मिळेल. आज धर्मादाय कामे होतील.

    कर्क : आजचा दिवस प्रतिकूल असू शकतो. तुमचे आरोग्यही ठीक नसेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला जाईल. कामाच्या बाबतीत एखाद्या दडपणाचा सामना करावा लागू शकतो. आज कोणतीही जोखीम घेऊ नका. विरोधक काही काळ शांत असतील. तुम्ही तुमच्या मेहनतीने यश मिळवत राहाल.

    सिंह : आजचा दिवस खूप चांगला असेल. तुमच्या मनात एखादी गोष्ट किंवा नवीन कल्पना असल्यास ती पुढे नेल्यास नक्कीच फायदा होईल. नातेवाईकांकडून जुन्या तक्रारी दूर करण्याची वेळ आली आहे. मित्रांसोबत राहणे फायद्याचे ठरू शकते.आधीपासून केलेले कोणतेही नियोजन आज पूर्ण होईल. प्रेमींनी आपापसांतील गैरसमज टाळले पाहिजे. तुमच्यात अहंकारावरून भांडण होऊ शकते.

    कन्या : आजचा तुमचा दिवस खूप व्यस्त असेल. तुम्हाला स्वतःसाठी तसेच इतरांसाठी धावपळ करावी लागेल. मनाने केलेल्या कार्याचा फायदा होईल. मनःशांती मिळेल. बऱ्याच काळापासून सुरू असलेला तणावही कमी होईल. जर तुम्ही इतरांना मदत केलीत तर तुम्हाला मदत करायला सुद्धा लोकं येतील. प्रामाणिकपणे जे काही काम कराल ते फलदायी ठरेल.

    तूळ : आजचा दिवस शुभ फळ देणारा आहे. दिवसाच्या उत्तरार्धात फोन कॉलद्वारे चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमधील सहकारी देखील टीम वर्कमुळे आनंदी होतील. व्यवहार आणि व्यवसायात धोका निर्माण होऊ शकतो. कोणताही करार करण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आज काही कारणास्तव तुमचा खर्च थोडासा वाढू शकतो. आज तुम्ही तुमच्या सुविधांवर पैसे खर्च करू शकता.

    वृश्चिक : आजचा दिवस तणावपूर्ण असेल. आज दिवसाच्या पहिल्या सत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल. संध्याकाळपर्यंत नफ्याच्या अनेक संधी मिळतील. प्रवासाचा योग आहे. एखाद्या पार्टीत चांगल्या आणि प्रभावी लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. कामाची काळजी मिटेल. आज तुम्हाला कुटूंबाबाबत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.

    धनू : आज तुमचा चांगला काळ आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जर कार्यालयातील सहकाऱ्यांशी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादात अडकले नसाल तर ते काम करणे सोपे होईल. तुम्ही ही मोहिम जिंकू शकता. पैशाशी संबंधित कामात अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. वडील एखादा मोठा निर्णय घेण्यात मदत करू शकतात. आज पैसे कोठे गुंतवायचे याबद्दल कोणतेही निर्णय घेणे टाळा.

    मकर : आजचा दिवस सावध राहण्याचा असेल. आज तुमचा कोणाबरोबरही वाद होणार नाही याची काळजी घ्या. कामाची परिस्थिती अधिक चांगली राहील. व्यवसायात नफा वाढेल आणि वैवाहिक जीवन यशस्वी होईल. आज तुम्ही काय करावे आणि काय करू नये याबद्दल विचार करणे गरजेचे आहे. कुटूंबाकडून बरेच प्रेम आणि आपुलकी मिळेल. मुलांशी संबंधित समस्यांचे निराकरण होईल.

    कुंभ : आजचा दिवस तुमच्यासाठी खूप सामान्य राहील. आजचा दिवस एकत्रित काम करण्याचा आहे. सहकाऱ्यांशी मिळून मिसळून कार्यालयात एकत्र काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. कोणत्याही प्रकारच्या वादापासून स्वत:ला दूर ठेवा. संभाषणातून एक नवीन फायदेशीर कल्पना डोक्यात येऊ शकते. मित्रासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करताना तुमचे बजेटकडे लक्ष ठेवा. आज जे लोक आजारांनी ग्रस्त आहेत, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

    मीन : आज तुम्हाला प्रत्येक कामात मेहनत घ्यावी लागेल. प्रगतीच्या दिशेने एकेक पाउल पुढे टाकाल. प्रयत्न करत राहिल्यास रखडलेले कामही मार्गी लागेल. सावध राहा आणि आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा, कदाचित ही संघर्षाची वेळ असेल. बाहेर वेळ घालवण्याऐवजी कुटुंबातील सदस्यांसमवेत वेळ घालवा कारण आज तुमचा खर्च जास्त होईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here