दोंडाईचा युवासेनातर्फे शिबीरात आरोग्य तपासणी केलेल्या नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधी वाटप

दोंडाईचा (प्रतिनिधी) : मागील आठवड्यात दि. २ जुलै रोजी युवासेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबीरात १५० नागरिकांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते. त्याचा रिपोर्ट काल दि. ८ जुलै रोजी नागरिकांना देण्यात आला. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

सविस्तर वृत्तानुसार, कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता तसेच युवासेना प्रमुख तथा कॅबिनेट मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके व युवासेनेचे जिल्हाप्रमुख ॲड.पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ०२ जुलै रोजी महादेवपुरा मोठ्या पुला जवळ रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात १५० नागरिकांनी आपल्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी दिले होते. त्याचे रिपोर्ट गुरुवार दि. ०८ जुलै २०२१ रोजी नागरिकांना देण्यात आले. सोबतच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरज असलेल्या 105 नागरिकांना मलटिव्हिटॅमिन, कॅल्शिअम, अँटिपयरिटी सी, सिरप सारखी औषधे फिरते रुग्णालया मार्फत नागरिकांना मोफत वाटप केले.

dondaicha
यासाठी दोंडाईचा वरवाडे नगरपरिषद व रोटरी क्लब दोंडाईचा यांचे मोठे सहकार्य लाभले. डॉ.हर्षल सोनवणे, निलेश जैन, सोनाली ईशी, रियाज मिरजा यांनी नागरिकांची तपासणी करून उपचार केले. त्याबद्दल कार्यक्रमानंतर युवासेनेतर्फे त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, युवासेनेचे तालुकाप्रमुख आकाश कोळी, शहरप्रमुख सागर पवार, निखिल जयसिंघानी, योगेश बोरसे, शिवसेनेचे उपशहरप्रमुख आबा चित्ते, चुडामण बोरसे, दिपक मराठे, विजय वाडीले, राज ढोले, लखन मराठे, सुरेश कोळी, सचिन कोळी, विशाल कोळी, बन्सी पुढारी, प्रकाश महाजन, सनी कोळी, भारत कोळी व परिसरातील नागरिक शिवसैनिक, युवासैनिक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किरण सावळे, जितु कोळी, संजय कोळी, उपशहरप्रमुख गणेश विसावे, चतुर कोळी यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here