एपिफेनी २०२१ : रंगूनवाला दंत महाविद्यालयात राज्यस्तरीय परिषदेला प्रतिसाद

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला दंत महाविद्यालयात आयोजित ‘एपिफेनी २०२१’ या राज्यस्तरीय परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला.

महाविद्यालयाच्या ओरल पॅथॉलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी विभागातर्फे ५ ते ७ जुलै रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते . संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते परिषदेचे उदघाटन करण्यात आले. ज्येष्ठ ओरल पॅथॉलॉजिस्ट डॉ एस ई श्रॉफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

प्राचार्य डॉ रमणदीप दुग्गल, रजिष्ट्रार आर ए शेख,संयोजक डॉ अजित कोशी ,डॉ समंथा ठाकूर यांच्यासह १३०० जण सहभागी झाले . ओरल पॅथॉलॉजिस्ट ,फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजिस्ट ,ओरल फिजिशियन्स ,मॅक्सीलोफेशल रेडियोलॉजिस्ट ,ओरल सर्जन्स यांचा प्रमुख सहभाग या परिषदेत होता . फॉरेन्सिक ओडोन्टोलॉजी ,म्युकरमायकोसिस आणि दंतोपचार क्षेत्रातील विषयांवर परिषदेत चर्चा झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here