जळगाव जिल्हा मराठा समाज अध्यक्षपदी पी एम पाटील

धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील) : जळगाव जिल्हा मराठा फाउंडेशन जिल्हाध्यक्ष पदी धरणगाव येथील माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांची निवड महाराष्ट्र प्रदेश मराठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अँड.बापूसाहेब जाधव यांच्या आदेशान्वये मराठा समाजाचे महाराष्ट्र सचिव रवींद्र धुमाळ यांनी एका पत्राद्वारे धरणगाव येथील पहिले मराठा समाजाचे नगराध्यक्ष पदाचे मानकरी पी एम पाटील यांची जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना,महिलांना,ज्येष्ठांना,बेरोजगारांच्या न्याय हक्कासाठी सदर मराठा समाज फाउंडेशनची स्थापना सन 2019 रोजी झाली असून जळगाव जिल्हातील सर्व सकल समाजाला एकत्र करून न्याय हक्क मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील असे पी एम पाटील यांनी नियुक्ती नंतर सांगितले.

त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव डी जी पाटील, विद्यापीठाचे संचालक प्रा.डी आर पाटील,मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील,धरणगाव नगराध्यक्ष नीलेश चौधरी,नूतन मराठा संस्थेचे मनोहर दादा पाटील,उपमहापौर कुलभूषण पाटील,जिल्हाध्यक्ष डॉ प्रशांत पाटील,दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन,मोती आप्पा पाटील,माजी नगरध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,चंदन पाटील,धरणगाव पाटील समाज अध्यक्ष भिमराज पाटील,गुलाब मराठे,गोपाल पाटील,संजय पाटील,बंटी पवार,योगेश पी.पाटील,दिपक जाधव,बापू जाधव,आर एच पाटील,छोटू जाधव,नंदू पाटील,धरणगाव तालुका अपंग महासंघ,धरणगाव तालुका शिवसेना,काँग्रेस कमिटी राष्ट्रवादी,भारतीय जनता पक्ष व समाज बांधवांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here