पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : जे एस सी एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने सायबर सिक्युरिटी विषयावर प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे.नुकतेच या अभ्यासक्रमाचे उदघाटन झाले.ट्रस्टचे विश्वस्त वरुण जोगळेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
वनाझ कॉर्नर (कोथरूड) येथे संस्थेच्या जागेत हा अभ्यासक्रम शिकविण्यात येत असून कोणत्याही वयोगटातील व्यक्तीसाठी तो उपलब्ध आहे.या अभ्यासक्रमास आंतरराष्ट्रीय मान्यता असून तो पूर्ण केल्यावर उद्योगजगतात नोकरी किंवा स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात.
अधिक माहितीसाठी ९५२९५१५४२८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल .






