जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : येथील नव्याने सरु होणाऱ्या अत्याधुनिक अशा अक्षया सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष एड. रविंद्रभैय्या पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे हस्ते पार पडले. आकाशवाणी चौकातील विद्या नगर येथे सुरु झालेल्या या सेंटरमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची ३२ स्लाईस सीटी स्कॅन मशीन बसविण्यात आली आहे, त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे निदान त्वरीत आणि तंतोतंत होणार आहे. निर्जंतुक आणि स्वच्छतेला महत्व देतांनाच विनम्र रुग्णसेवा देण्याचा आमचा मानस आहे असे सिटी स्कॅन सेंटरच्या संचालकांनी सांगीतले. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी गोपाळराव देवकर, विशाल देवकर, लिलाधर तायडे, अजय सोनवणे, सुनिल माळी, अशोक लाडवंजारी, परेश कोल्हे, दिलीप माहेश्वरी, निलेश पाटील, मंगला पाटील, खुशाल चव्हाण, सुजित शिंदे, मोहन पाटील, धनराज माळी, बापू परदेशी, संतोष मेंढके, धवल पाटील, डॉ. नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.







