लखनऊमध्ये पकडलेल्या दहशतवाद्यांचे कानपूर कनेक्शन

एटीएसने ४ संशयितांना घेतले ताब्यात

कानपूर – उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एटीएसने अल कायदा समर्थित अन्सार गजवतुल हिंद संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना लखनऊमधून अटक केली आहे. एटीएसच्या या कारवाईने एक मोठा कट उधळून लावला आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशतवादी मसीरुद्दीन आणि मिनहाजचे अनेक साथीदार अद्याप फरार आहेत, त्यांचे कानपूरचे कनेक्शन समोर येत आहे. एटीएसच्या अनेक पथकांनी शहरातील चमनगंज, जाजमऊ, नई सडक, मचारिया यासारख्या ठिकाणी तळ ठोकले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसने छापा टाकून रात्री उशिरा चार ते पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here