अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : मैदर्गी नगरपरिषदेच्या वतीने दि. १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११:०० वाजता मा. नगराध्यक्षा सौ. दीप्ती किरण केसुर, मुख्याधिकारी श्री. श्रीकांत लाळगे व सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या हस्ते मैदर्गी शहरातील या पूर्वी वितरीत न केलेल्या दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ७१००/- रु निधी वितरीत करण्यात आला.
या कार्यक्रमात २५ दिव्यांग नागरिकांना १,७७,५००/- रु निधी वितरीत करण्यात आला. ज्या व्यक्तींना अद्याप ७१००/- रु निधी मिळालेला नाही अश्या व्यक्तींना न.प कार्यालयास संपर्क करावे असे आवाहन मा. नगराध्यक्षा सौ.दीप्ती किरण केसुर यांनी केले आहे.






