कोल्हापूर (महाराष्ट्र प्रतिनिधी सतीश चव्हाण) : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि अत्यावशक वस्तूच्या महागाईमुळे सामान्य जनता भरडून निघत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ना. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या सुचनेनुसार केंद्रातील भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात कबनूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकात मोदींच्या प्रतिकात्मक पुतळा दहन करून व केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली.
यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बैलगाडीतुन जाऊन कबनूरचे मंडल अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अध्यक्ष अरूण गिते, कार्याध्यक्ष अल्ताफ मुजावर, उपाध्यक्ष रियाज चिकोडे, युवक अध्यक्ष महेश कांबळे , युवक कार्याध्यक्ष शिवा चव्हाण, प्रशांत लोले, युवराज कांबळे, तौफिक पटेल, राजू बोराडे , मुज्जमिल मुजावर, अशोक पाटने, राजू गवरे, महावीर लिगाडे, मलाप्पा माळी, शुभम बोराडे, नुर देसाई, शिवरतन शिंगे, फारूख मोमीन , विकास कांबळे, रियाज शेख, हुजेफा अरबाळै आदी उपस्थित होते.






