दि. १६ जुलै राशिभविष्य : सूर्य आणि मंगळ हे दोन अग्नी तत्व असलेल्या ग्रहांचा संयोग

मेष: आज खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. घराबाहेर खाणे टाळा. ऑफिसमधील विरोधकाच्या कटापासून सावध रहा. आज खर्चही जास्त होईल. घरातील लहान सदस्यांसोबत जास्त वेळ घालवा. त्यांना तुमच्या मदतीची नितांत गरज आहे.

वृषभ : आजचा दिवस शुभ दिवस आहे. आज प्रियकराची भेट होण्याची संधी आहे. यामुळे आनंद होईल. दिवसभर उत्साह कायम राहील. व्यवसायात गोंधळामुळे नफ्याच्या बाबतीत अडथळे येऊ शकतात. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन प्रकरण सोडवले जाऊ शकते.

मिथुन : आज सावधगिरीने चालायचा दिवस आहे. आजूबाजूच्या लोकांशी वाद घालू नका, अन्यथा वाद वाढू शकतात. तुम्हाला शुभ कार्यात जाण्याची संधी मिळेल. इतरांना मदत केल्याने मनाला शांतता लाभेल.

कर्क : आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य परिणाम देणारा असेल. विरुध्द लिंगाच्या लोकांबरोबर वेळ चांगला जाईल. प्रामाणिकपणे तयार केलेले संबंध बराच काळ टिकतील. आज काही लोकांचे नशीब उजळेल.

सिंह : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. आज तुम्ही कोणतीही कामे परिश्रमपूर्वक व प्रामाणिकपणाने केलीत तर याचा शुभ परिणाम मिळेल. याशिवाय आज जोडीदारासोबत संध्याकाळच्या वेळी खास कार्यक्रम आखू शकतात. कुटूंबातील सदस्यांसह अचानक बाहेर जाणे फायदेशीर ठरेल. एखाद्याशी वाद घालणे तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकते.

कन्या : आजचा दिवस आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी नफ्याची संधी मिळेल. प्रभावशाली व्यक्तीवर पैसा खर्च होईल. अभ्यासामध्ये गोडी असेल. आज जीवनात नवीन वळण येईल. प्रवासाचा योग आहे. याशिवाय ई-मेल किंवा एसएमएसद्वारे महत्त्वपूर्ण बातम्या प्राप्त होतील. प्रॉपर्टीच्या कागदपत्रांबाबत जागरूक रहा.

तूळ : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आज बर्‍याच समस्या सोडवल्या जाऊ शकतात. आज पैसा आणि आरोग्याशी संबंधित समस्याही सुटतील. संध्याकाळपर्यंत एखाद्या खास व्यक्तीशी तुमची ओळख होईल. व्यवसायामध्ये तुम्हाला फायदे होतील. काहीतरी विशेष वस्तू गहाळ झाल्यामुळे समस्या उद्भवू शकतात.

वृश्चिक : आजचा दिवस खूप रचनात्मक आहे. आज थोड्या कष्टाने सन्मान मिळण्याचा योग आहे. तुम्ही चांगल्या वागणूकीने नवीन मित्र बनवाल आणि नव्या प्रोजेक्टवर कामही सुरू होईल. कौटुंबिक जीवनात पत्नी व मुलांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न होईल. कार्यालयात विशेष बदल होतील आणि कामही पूर्ण होतांना दिसेल.

धनू : तुमच्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. राजकीय कामात वाढ होईल. अनुभवी व्यक्तीकडून फायदा होईल. पण त्यासाठी पैसे लागतील. अभ्यासामध्ये रस असेल. जीवनात नवीन वळण येईल. आरोग्याबद्दल चिंता असेल, परंतु खाण्यापिण्यात काळजी घेतल्याने परिस्थिती सुधारू शकते. मालमत्तेच्या प्रकरणांचे निराकरण देखील होऊ शकते.

मकर : किरकोळ भांडणे दिवसाच्या उत्तरार्धात डोके वर काढतील. परंतु तुमच्या सामंजस्याने त्याचे निवारण केले जाईल. वाढत्या खर्चाला आळा बसेल. जर तुम्ही कठोर परिश्रम केले आणि तुमची वागणुकीत सुधारणा केली तर तुम्हाला फायदा होईल. ज्येष्ठ सदस्या काळजीत असतील. समस्या कमी होतील.

कुंभ : आजचा दिवस थोडा धीम्या गतीचा आहे. ऑफिसमध्ये काम करण्याची घाई करू नका. अन्यथा नुकसान होईल. जर हे तुम्ही सहजतेने केले तर नफ्यातच राहाल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिले पाहिजे. आज कुटुंबाशी संबंधित मालमत्तेचा लाभ लोकांना मिळू शकतो. कठोर परिश्रम केल्यास चांगले परिणाम मिळतील. कार्यालयातील नवीन सहकारी कामात पूर्ण सहकार्य करतील.

मीन : आजचा दिवस खूप भाग्याचा असेल. व्यवसायात आणि गुंतवणूकीशी संबंधित कामातील अडचणी संपतील. विशेष लोकांच्या मदतीने तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. आज तुम्हाला प्रवास आणि मनोरंजनाचा आनंद घेता येईल. दररोजचा नित्यक्रम बनवा आणि खाण्यापिण्याचे वेळापत्रक पद्धतशीरपणे तयार करा. तुमचे सहकारी कामात मदत करतील. परंतु कोणालाही काम करण्यास भाग पाडू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here