श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे मुख्यमंत्र्यांना आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेचे निमंत्रण

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : काल गुरूवार (दि.१५) आषाढी यात्रा -२०२१ चे श्री विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या शासकीय महापूजेचे निमंत्रण देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख नामदार उध्दव ठाकरे यांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने वर्षा निवासस्थानी जाऊन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण व राजशिष्ठाचार मंत्री नामदार आदित्य ठाकरे, खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत व मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहीनीनाथ महाराज औसेकर, अतुल नंदकुमार राजुरकर युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य व शिवसेना जिल्हा प्रमुख पंढरपूर विभाग व सदस्य श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती संभाजी शिंदे, समिती सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळ्गांवकर, समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी हे उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here